नांदेड-लोहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
नांदेड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेश झाला भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शरद पवार,
अ


नांदेड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेश झाला

भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शरद पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊराव कंधारे, भारतीय जनता पार्टीच्या सविताताई सातेगाव, माजी सभापती पंकज परिहार, शेषराव तेलंग, राहुल बोरगावकर, गजानन उत्तरवार, माधवराव आन्नकाडे, वजीर कुरेशी, रमजान कुरेशी यांच्या सह अनेक जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश दिला.

यावेळी बोलताना आमदार चिखलीकर म्हणाले की,आपला पक्ष शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालत होता, आजही त्याच विचारधारेने चालतो आहे आणि पुढेही चालत राहणार आहे. आपण प्रत्येक जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणार आहोत, ‘सर्वधर्मसमभाव’ हीच आपल्या समाजकारणाची ओळख आहे. आजच्या पक्षप्रवेशामुळे लोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नक्कीच वाढली असून, येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचं यश दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच येत्या काळात सर्वांनी एकजुटीने आणि जबाबदारीने पक्षाची विकासाभिमुख विचारधारा घरोघरी पोहोचवण्यासाठी आणि पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही केले.

यावेळी माजी आमदार मोहनराव हंबर्डे, दिलीपराव धर्माधिकारी, ॲड. मुक्तेश्वरभाऊ धोंडगे, प्रवीण पाटील चिखलीकर, उदयराव चव्हाण, सचिन पाटील चिखलीकर, माणिकराव मुकदम, किरण सावकार वट्टमवार, केशवराव मुकदम, नामदेवराव पवार, दत्तात्रय वाले, केशवराव मुकदम, रावसाहेब इंगोले, दीपक कानवटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande