धुळ्यातील मानसशास्त्रतज्ञ प्रा. वैशाली पाटील यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार
धुळे, 16 नोव्हेंबर (हिं.स.) महिला आणि बालकल्याण विभागाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यासाठी धुळे जिल्ह्यातील २०२१-२२ या वर्षीचा पुरस्कार हा मानसशास्त्रतज्ञ प्रा. वैशाली पाटील यांना घोषित केला आहे. म्हणून कुलगुरू
धुळ्यातील मानसशास्त्रतज्ञ प्रा. वैशाली पाटील यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार


धुळे, 16 नोव्हेंबर (हिं.स.) महिला आणि बालकल्याण विभागाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यासाठी धुळे जिल्ह्यातील २०२१-२२ या वर्षीचा पुरस्कार हा मानसशास्त्रतज्ञ प्रा. वैशाली पाटील यांना घोषित केला आहे. म्हणून कुलगुरू प्रा. व्हि. एल. महेश्वरी, प्र कुलगुरू एस. टी. इंगळे, रजिस्ट्रार विनोद पाटील, कॉमर्स विभागाचे डीन, ह्युमँनिटीजचे डिन व प्राचार्य डॉ.जगदीश पाटील ,सौ.मनिषा पाटील, प्रा. डोंगरे ,डॉ. देवेंद्र विसपुते, डॉ. वाणी यांनी सत्कार केला. तर फ्रेडंस फाँर एव्हर ग्रुप ,इंडियन रेड क्रॉस सोसायटी धुळे, धन्वंतरी पतसंस्था , दिनानाथ मित्र मंंडळ , हँपी क्लब यांनी ही शुभेच्छा व समाधान व्यक्त केले.

प्रा. वैशाली पाटील ह्या करत असलेल्या कामाच मुल्यच होवु शकत नाही. मनाच्या प्रवासाच्या मानस शिल्पकार हि सर्व सामान्य जनतेचे त्यांना दिलेली हि पदवी आहे. बालकल्याण समितीत त्यांनी सदस्य या म्हणून पाच हजारा पेक्षा जास्त प्रकरणे निकाली काढले आहेत. तसेच बाल स्नेही समाजाच्या उद्देशाने महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे 32 जिल्ह्यातील पोलीसाना बाल अधिनियमाचे प्रशिक्षण देणे व मानसशास्त्रीय कार्यशाळेच्या माध्यमातून संपूर्ण खानदेशात निर्विकार मनाला आकार देण, समाधानी, आनंदी,सरळ प्रामाणिक आयुष्य जगण त्यांनी अनेकांना शिकवले. बालकांपासून तरुण ज्येष्ठ नागरिकांपर्यंत केलेली जनजागृती व राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यावर शिव व्याख्याने देणे , भारत स्त्री रत्न नाटक स्वतः लिहुन ,दिग्दर्शन करुन सर्वसामान्य महिलांना ज्या नेहमी घरात राहतात. त्यांना स्टेजवर कसं बोलायचं हे शिकवलं आणि अनेक जिल्ह्यात अनेक महिलांचा आत्मविश्वास त्यांनी वाढवला ,कविता, चारोळी, अभिनय इ. माध्यमातून महिला सक्षमीकरण केले. यासाठी जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाने हि समाधान व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande