नांदेड : लोहा विधानसभा मतदारसंघातील अनेकांचा भाजप प्रवेश
नांदेड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघातील अनेक पक्षांमधील नेते पदाधिकारी यांनी आज नांदेड येथे माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते भाजपा नेते एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षांमध्य
अ


नांदेड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघातील अनेक पक्षांमधील नेते पदाधिकारी यांनी आज

नांदेड येथे माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते भाजपा नेते एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षांमध्ये प्रवेश केला.

नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे अशा परिस्थितीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षात अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रवेश केला आहे. आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शिवाजी आंबेकर कोषाध्यक्ष काँग्रेस कमिटी, मिलिंद पाटील पवार शिवसेना विधानसभा प्रमुख, हनुमंत लांडगे,गजानन गुंठे शिवसेना शहर प्रमुख, मारुती पंदलवाड ता.अध्यक्ष भोई समाज, निखिल महाबळे राष्ट्रवादी काँग्रेस, किरण डोईफोडे राष्ट्रवादी काँग्रेस,

केशव पवार राष्ट्रवादी काँग्रेस, लक्ष्मण कांजले,यांनी पक्षप्रवेश केला.

या वेळी बालाजी पा.पुयड पुणेगावकर,भास्कर पाटील ढगे,युवराज वाघमारे, दिनेश पा. मोटे, ऋषीं मैड,ब्राह्मनंद पा. शिरसाठ, व पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande