नांदेड : शिवसेनेने दिला घटक पक्षांना महायुतीचा प्रस्ताव
नांदेड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपरिषद आणि एक नगर पंचायत निवडणुकीसाठी महायुती करण्याच्या संदर्भात घटक पक्षांना प्रस्ताव दिला आहे. शिवसेना महायुती म्हणून निवडणूक लढवण्यात तयार असल्याचे शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर यांनी
a


नांदेड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपरिषद आणि एक नगर पंचायत निवडणुकीसाठी महायुती करण्याच्या संदर्भात घटक पक्षांना प्रस्ताव दिला आहे. शिवसेना महायुती म्हणून निवडणूक लढवण्यात तयार असल्याचे शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर यांनी सांगितले.

नांदेड येथे शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोंढारकर व आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.

या पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यातील १२ नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांना जागावाटपाचा प्रस्ताव दिलेला जाहीर केला. शिवसेनेची प्रामाणिक इच्छा आहे की या सर्व कार्यकर्त्याच्या निवडणुका युतीमध्ये लढल्या पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आहे..

यावेळी आमदार बालाजीराव कल्याणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे,जिल्हाप्रमुख उमेश मुंडे,सहसंपर्कप्रमुख स.दर्शनसिंघ सिध्दू,ओबीसी-एससी-एसटी जिल्हाप्रमुख मंगेश कदम, शयाम पाटील वानखेडे,रवि थोरात उपस्थित होते.

------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande