
नाशिक, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।
- आज रविवारी सकाळी ११ वा प्रभाग क्रमांक 1 मधील मेरी म्हसरूळ परिसरातील सर्वपक्षीय व सर्व गटातील इच्छुक उमेदवारांचा ‘स्नेह संवाद कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला सर्वसाधारण,नागरिकांचा मागास वर्ग महिला,अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती या चारही गटातील चाळीस इच्छुक उमेदवार सहभागी झाले होते अमित घुगे यांच्या संकल्पनेतून प्रथमच असा. कार्यक्रम झाला उमेदवारांचा एकमेकांशी परिचय संवाद व अल्पोपहार झाल्यानंतर सर्व उमेदवारांनी एकत्रित छायाचित्र काढले महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा हेतू असल्याचे घुगे यांनी सांगितले.
सेवालय गोरक्षनगर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी याप्रसंगी रंजना भानसी ,अरुण पवार, अमित घुगे, गणेश चव्हाण ,प्रवीण जाधव, सुनील निरगुडे,संतोष पेलमहाले,दिपाली गीते, शोभा साळवे, वंदना पेलमहाले,शाळीग्राम ठाकूर, करुणा गायकवाड आदींसह उमेदवार उपस्थित होते. परिसरात झालेला हा स्नेहसंवाद कार्यक्रम प्रभागातील एकोप्याची, सहकार्याची आणि लोकशाहीतील सहभागाची परंपरा अधिक मजबूत करणारा ठरला .
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV