
पिंपरी, 16 नोव्हेंबर (हिं.स.)पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता खालावण्यास रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पही कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने कारवाई हाती घेतली आहे. उपद्रव शोध पथकाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख आणि मोशी परिसरातील नऊ आरएमसी प्रकल्पाची तपासणी करत लाखबंद (सील) केले. वायुप्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न केलेल्या ३० प्रकल्पांवर कारवाई करण्यात येणार आहे.पिंपरी-चिंचवड शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत असून टाेलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. बांधकाम प्रकल्पासाठी शहराच्या विविध भागांत आरएमसी प्रकल्पांची संख्याही सातत्याने वाढत आहे. वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरएमसी प्रकल्पांसाठी नवे आणि अधिक कठोर मार्गदर्शक नियम लागू केले आहेत. मात्र, प्रकल्प चालकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु