
पुणे, 16 नोव्हेंबर (हिं.स.)‘पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेकरिता सुमारे 50 देशाचे खेळाडू भारतात येणार असल्याने त्यांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने पोलीस विभागाची महत्वाची जबाबदारी आहे, त्यामुळे युसीआय मानकांनुसार संपूर्ण स्पर्धेची सुरक्षात्मक उपायोजना करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग आणि परिवहन विभागासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे ग्रँड चॅलेज टूरचे तांत्रिक संचालक पिनाकी बायसक आदी उपस्थित होते.श्री. डुडी म्हणाले, ‘पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षा पासेस, सायकलपट्टूची वाहतूक, ट्रॅकवरील सुविधा, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण, शहरी भागासह ग्रामीण भागातील भौगोलिक परिस्थिती, गर्दी, परिसरातील नागरिकांची जनजागृती, पोलीस अधिकारी व सायकल संघटनांचा समन्वय आदी बाबींचा प्रामुख्यांने विचार करावा. स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत रस्त्याची लांबी सुरक्षेच्यादृष्टीने तपासणी केली करावी. ग्रामीण भागासह शहरी भागात ही स्पर्धा होणार असल्याने पोलीस विभागाचे एकच पथक कॉनव्हसोबत असावे. खेळाडूंच्या आगमनापासून ते प्रयाणापर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात यावा. सुरक्षा पासेस देण्याबाबतही नियोजन करावे, सायकलिंग स्पर्धा यशस्वीकरण्याकरिता सर्वसंबंधितांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना श्री. डुडी यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु