
सोलापूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।सोलापूर महानगरपालिकेसाठी पुन्हा दुसऱ्यांदा सोमवारीआरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे पुन्हा महापालिकेतील काही जागांवरील आरक्षणात बदल होणार असल्याने त्याचा राजकीय फटका कोणाला बसणार, हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. मंगळवारी, दि. 11 नोव्हेंबर रोजी सोलापूर महानगरपालिकेसाठी आरक्षण निश्चिती करण्यात आली होती. परंतु, ओबीसी आरक्षणाची एक जागा कमी झाली होती. त्यामुळे राजकीय आरक्षणातील नियम पाळले नसल्याचा मुद्दा समोर आला होता.त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगामार्फत 14 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार नवी मुंबई, उल्हासनगर, पनवेल, मालेगाव, जळगाव, सोलापूर, इचलकरंजी आणि जालना या महानगरपालिकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला या प्रवर्गांकरिता पुनश्च आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड