
नाशिक, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।
ग्लोबल वॉर्मिंगने सारे निरसर्गाचे चक्र बदलून गेले आहे. आपण याबाबत वेळीच पावले उचलली नाहीत तर भविष्यात अनेक संकटे समोर येतील. अशावेळी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रयत्नातून झालेला वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. जगद्गुरु शेतकरी, दुष्काळग्रस्त, पूरग्रस्त, रस्ते सुरक्षा, वृक्षलागवड, रक्तदान, देहदान असे चौफेर कार्य सुरू आहे, असे गौरवोद्गार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज नाशिक रामशेज उपपिठावर व्यक्त केले. यावेळी संतपीठावर रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी उपस्थित होते.
संस्थानने सात उपपीठावरून निघालेल्या पायदिंड्यांच्या माध्यमातून अवघ्या ३० दिवसांत १,११,४२४ वृक्षरोपांची लागवड केली. त्याच्या संकल्पपूर्तीनिमित्त आयोजिक केलेल्या सोहळ्यात मंत्री बोलत होते. याप्रसंगी राज्याचे क्रिडा मंत्री माणिकराव कोकाटे, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, पाचोरा - भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर यावेळी वृक्षारोपणात उत्कृष्ट कार्य केलेल्या, अधिकाधिक वृक्ष लागवड केलेल्या उपपीठ मराठवाडाचा, छत्रपती संभाजीनर जिल्ह्याचा, हवेली पुणे तालुक्याचा व वीस व्यक्तींचा मंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी वनखात्याचे अनेक अधिकारी, उपपीठाचे प्रतिनिधी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री श्री नाईक पुढे म्हणाले, “यंदा पाऊस मेपासून नोव्हेबरपर्यंत रेंगाळला. एक हजार कि.मी. मध्ये पडणारा पाऊस शंभर कि.मी.मध्ये पडतो आहे. यंदा मराठवाड्यातील काही गावांना तर पाण्याचा वेढा बसला. या सा-यांचे कारण उष्णता वाढते आहे. वृक्षतोड, औद्योगिकीकरण व भूगर्भातील निसर्गधन हावरेपणाने लुटल्याने ग्लोबल वॉर्मिंगचा धोका निर्माण झाला आहे. आता जगभरात जर वृक्षोरापण मोहीम हाती घेतली तर उष्णता झपाट्याने कमी होईल. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनीराबवलेला वृक्षारोपणाचा उपक्रम म्हणून कौतुकास्पद आहे. त्यांच्या उपक्रमांची व्याप्ती वाढत राहो.”
राज्यभर बिबट्यांचे संकट वाढत असल्याचा उल्लेख करून श्री नाईक पुढे म्हणाले, “आज बिवट्यांचे मनुष्यावरील हल्ले वाढले आहेत. त्याच्या आधिवासात माणसाचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे बिवटे मानवी वस्तीत येऊन हल्ले करीत आहेत. यावर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. अनेक उपाय केले जात आहेत. उद्या संयुक्त बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा करणार आहोत.”
यावेळी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी वनमंत्र्यांच्या कार्याचा, त्यांनी दिलेल्या वृक्षरोपांचा गौरव केला. ते आपल्या भाषणात म्हणाले, “वृक्षारोपण हा केवळ कार्यक्रम नाही तर तो एक सामुहिक संकल्प यज्ञ आहे. आपण अध्यात्म व विज्ञानाची सांगड घातली तर निश्चित यशाची शिखरे पादाक्रांत करू. वृक्ष म्हणजे जीवन आहे. ते पृथ्वीचा श्वास आहेत. आकाशाची छाया आहे. वा-याची शीतलता आहे व मानवजातीचे भविष्य आहे. वृक्षा लावणे ही भक्ती आहे. पायीदिड्यांमधून आम्ही जनजागृती करीत असतो. वृक्ष लावा, पाणी आडवा, पाणी जिरवा असे आम्ही सांगत असतो. आत पुढचा आमचा संकल्प कच्चे बंधारे बांधण्याचा आहे. ७ ते १५ डिसेंबर या कालावधील हजारो कच्चे बंधारे बांधले जातील.”
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV