खोपोली नगराध्यक्षपदाची लढत रंगतदार; पत्रकार किशोर साळुंके रिंगणात
रायगड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठीची स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 15 नोव्हेंबर रोजी खोपोली नगर परिषद येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पत्रकार
नगराध्यक्षपदाची लढत रंगतदार; पत्रकार किशोर साळुंके रिंगणातa


रायगड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।

खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठीची स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 15 नोव्हेंबर रोजी खोपोली नगर परिषद येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पत्रकार किशोर साळुंके यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल करून निवडणुकीची औपचारिक सुरुवात केली.

अर्ज दाखल करताना बहुजन यूथ पँथरचे शेकडो कार्यकर्ते, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच साळुंके यांचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजीच्या तालात साळुंके यांचे स्वागत करण्यात आले. अर्ज भरतानाच कार्यालयाबाहेर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यकर्त्यांच्या या मोठ्या उपस्थितीमुळे साळुंके यांचा आत्मविश्वास आणखी दृढ झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

साळुंके उमेदवारी करताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील दीर्घ कारकिर्दीमुळे आणि स्थानिक प्रश्नांवरील आक्रमक भुमिकेमुळे ते जनतेच्या मनात स्वतंत्र ओळख निर्माण करू शकले. त्यामुळेच नगराध्यक्षपदासाठीची स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

निवडणूक प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असून लवकरच अर्ज तपासणी, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आणि पुढील प्रचारासाठी उमेदवारांच्या रणनीतींना वेग येण्याची शक्यता आहे. खोपोलीतील निवडणूक वातावरणात आता नवचैतन्य संचारले असून पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणांना नव्या दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande