
नाशिक, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। युनियन बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने “मेगा MSME व रिटेल एक्स्पो – 2025” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष युनियन बँक ऑफ इंडीया चे क्षेत्र प्रमुख प्रभात कुमार यांनी उपस्थित
उद्योजकांना मार्गदर्शन केले. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष
ललित बूब यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून MSME व रिटेल क्षेत्रातील वाढीच्या संधींबाबत
मौलिक विचार मांडले.
या कार्यक्रमाला उप क्षेत्र प्रमुख हरेंद्र कुमार जेना, उप क्षेत्र प्रमुख . कृष्ण प्रसाद, MLP Head
कुंजन पटेल, RLP Head प्रशांत शेजवळ तसेच नाशिक शहरातील सर्व शाखा व्यवस्थापक उपस्थित
होते.
एक्स्पोमध्ये MSME व रिटेल उद्योजक, वाहन विक्रेते, बांधकाम व्यावसायिक आणि उच्च शिक्षण
सल्लागारांचा उत्स्फूर्त सहभाग होता. बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती, MSME व रिटेल क्षेत्रातील
सादरीकरणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि उद्योजक व ग्राहकांना क्षणात कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण हे
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
या एक्स्पोच्या माध्यमातून उद्योजकांना नेटवर्किंग, व्यवसाय वृद्धी आणि नवीन बाजारातील संधी
शोधण्याची महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV