
पुणे, 16 नोव्हेंबर (हिं.स.)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तेथील पक्ष, संघटना एकत्रित लढतात. त्याचा परिणाम राज्यातील महायुतीवर होणार नाही. राज्यातील सरकार मजबूत आहे. महापालिकेच्या निवडणुकीस वेळ आहे, मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल. पक्ष सांगेल, तशी युती-आघाडी होईल.' अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. नवले पुलावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी शासकीय विश्रामगृह येथे महापालिका, पोलिस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) अशा विविध विभागांमधील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
मोहोळ म्हणाले, 'महापालिका किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर होत असतात. त्यानुसार, या निवडणुकीसाठी पक्ष सांगेल, त्याप्रमाणे युती-आघाडी होत असता. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतही होईल. मात्र पक्षातील वरिष्ठ सांगतील, त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु