अंबड नगर परिषदेत भाजप विजयी होणार -खा. कराड
छत्रपती संभाजीनगर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।अंबड नगर परिषदेच्या सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निश्चितपणे विजय होतील नगराध्यक्ष देखील भारतीय जनता पक्षाचाच होणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार माजी केंद्रीय मंत्री भागवत
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।अंबड नगर परिषदेच्या सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निश्चितपणे विजय होतील नगराध्यक्ष देखील भारतीय जनता पक्षाचाच होणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आज सांगितले.अंबड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजप उमेदवारांच्या नामनिर्देशन दाखल कार्यक्रमानिमित्त आयोजित विजयी संकल्प सभा आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, अंबड येथे प्रचंड उत्साहात पार पडली.

माजी केंद्रीय अर्थमंत्री खा. श्री. डॉ. भागवत कराड आणि माजी आमदार विलास बाप्पू खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सभेला कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.दीपक भैया ठाकूर, औदुंबर बागडे, ओमप्रकाश चितळकर, डॉ. राजेंद्र ठोसर, बबन भाऊ बुंदेलखंडे, अवधूत नाना खडके, अनिलराव कोलते पाटील, हरिश्चंद्र बाबा शिंदे, भगवान मात्रे, अशोक लांडे, देविदास कुचे, केदार कुलकर्णी, रमेश शहाणे, तारेख चाऊस, विश्वजीत दादा खरात, वैशाली ताई कोटुंबे, प्रदीप पवार, सौरभ कुलकर्णी, श्रीराम नागरे सर, पांडुरंग शिंदे, नसिर बागवान आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारबंधू–भगिनी यांची मोठ्या संख्येतील उपस्थिती विजयाची खात्री देणारी ठरली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande