
लातूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।
औसा नगर परिषद निवडणूकीसाठी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार अँड. मंजुषा रुपेश माडजे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जनतेच्या विकासाचा ध्यास, औसाच्या प्रगतीची नवदिशा आणि पारदर्शक प्रशासनाचे वचन घेऊन अँड. मंजुषाताई मैदानात उतरल्या आहेत. असे यावेळी सांगण्यात आले. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित राहिले. औसाच्या सर्वांगीण विकास, सुशासन आणि नागरिकांच्या हक्कांसाठी एक सक्षम, अभ्यासू असल्याचे सांगण्यात आले आहे
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis