
छत्रपती संभाजीनगर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।अंबड नगरपरिषद निवडणुकीत भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. देवयानी केदार कुलकर्णी तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी आपल्या नामनिर्देशन अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आज विधिवत नोंदणी केली.माजी केंद्रीय मंत्री खा. श्री. डॉ. भागवत कराड माजी आमदार विलास बाप्पू खरात प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी विजयी संकल्प पदयात्रेचा शुभारंभ आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे करण्यात आला.ही पदयात्रा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात संपन्न झाली. याप्रसंगी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष दीपक भैया ठाकूर, औदुंबर बागडे, रासपा नेते ओमप्रकाश चितळकर, डॉ. राजेंद्र ठोसर केदार कुलकर्णी, सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis