मुखेड शहरात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने नामांकन दाखल
नांदेड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुखेड शहरात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने नामांकन दाखल कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण तसेच जिल्हाध्यक्
अ


नांदेड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुखेड शहरात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने नामांकन दाखल कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण तसेच जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

काँग्रेस महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या पत्नींचा अर्ज दाखल करून करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनीही आपली नामांकने अधिकृतरीत्या दाखल केली.

यावेळी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात सुरेंद्र घोडसकर, दिलीप पाटील बेटमोगरेकर, राजू पाटील रावणगावकर शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र नाईक शिवसेना तालुका अध्यक्ष उमेश पाटील आडळकर मनसे तालुका अध्यक्ष संतोष बनसोड पवार एम आर पाटील गोपनर संभाजी पाटील उंदरीकर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकजूट, विकास आणि लोकहिताच्या ध्येयासाठी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande