डॉ. मेहरा श्रीखंडे लिखित `उर्जेचे गूढ विश्व’चे शानदार प्रकाशन
पुणे, 17 नोव्हेंबर (हिं.स.) - डॉ. मेहरा श्रीखंडे लिखित `मिस्टिक वर्ल्ड डिकोडेड'' या इंग्रजी आणि त्याच्या `उर्जेचे गूढ विश्व ’ या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन लोकमान्य रुग्णालयाचे चेअरमन व संचालक डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात क
उर्जेचे गूढ विश्व पुस्तक प्रकाशन


पुणे, 17 नोव्हेंबर (हिं.स.) - डॉ. मेहरा श्रीखंडे लिखित `मिस्टिक वर्ल्ड डिकोडेड' या इंग्रजी आणि त्याच्या `उर्जेचे गूढ विश्व ’ या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन लोकमान्य रुग्णालयाचे चेअरमन व संचालक डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात करण्यात आले. मराठी पुस्तकाचा अनुवाद मुंबईस्थित पत्रकार अशोक शिंदे यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन स्नेहल सिंग यांच्या माईंड स्पिरिट वर्क्स या संस्थेने केले आहे.

उर्जा शास्त्र अनेकदा वैद्यकीय क्षेत्रालादेखील अचंबित करते, अनेक परिणामकारक कृती घडताना या उर्जेचे अस्तित्व मानवी जीवनात निश्चित असते, असा विश्वास बसू लागतो. त्यामुळे या शास्त्रालादेखील समजून घेतले पाहिजे, असे विचार डॉ. नरेंद्र वैद्य यांनी व्यक्त केले.

विश्वातील विविध स्वरुपात असलेल्या उर्जेचे महत्व तसेच त्या ग्रहण करून आपले जीवन सकारात्मक करण्याच्या दृष्टीने वाटचाल कशी करता येईल, याबाबतचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. तसेच जगभरातील विविध संस्कृती तसेच परंपरांमध्ये असलेल्या उर्जा ग्रहण पद्धतींचाही त्यात समावेश केला गेला आहे. कबाला, देवदूतांचे अंक, बाख फ्लावर थेरपी, नाद चिकित्सा, गंध चिकित्सा, मंत्र, योग, हिलिंग, क्वांटम थेरपी अशा अनेक पद्धतींना या पुस्तकातून समजावून देण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. मेहरा श्रीखंडे यांनी सांगितले.

विश्वाची प्रारंभिक भाषा ही उर्जा आहे. प्रत्येकातून मिळालेल्या उर्जेतून मनुष्य आणि सजीव सृष्टी ऐकमेकांना समजून पुढची वाटचाल करू शकली, त्याचबरोबर हे शास्त्र देश-विदेशात वेगवेगळ्या पद्धतींनी रुजले आहे, त्याचा आढावा अशोक शिंदे यांनी यावेळी घेतला तसेच विज्ञान आणि विविध संस्कृतींमधील दाखलेही त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande