मतदान कार्ड नाही, टेन्शन नाही! १२ पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक दाखवा
अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। नगर परिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसले, तरी टेन्शन घेण्याचे कारण नाही. मतदारांना १२ पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक दाखवून मतदान करु शकतील. मतदार यादीत
मतदान कार्ड नाही, टेन्शन नाही! १२ पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक दाखवा


अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।

नगर परिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसले, तरी टेन्शन घेण्याचे कारण नाही. मतदारांना १२ पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक दाखवून मतदान करु शकतील. मतदार यादीत आपले नाव असल्यास, वोटर आयडी हरवला किंवा मिळाला नसेल तरीही मतदान करता येईल. फक्त ओळख सिद्ध करणारा दुसरा पुरावा सोबत असणे आवश्यक आहे.मतदार ओळखपत्र हरवले असल्यास किंवा मिळाले नसेल, तर राष्ट्रीय मतदार सेवा या संकेतस्थळावरून घरी बसून नवीन कार्डसाठी अर्ज करता येईल.'डीजी लॉकर' हे शासनमान्य अॅप असल्याने त्यातील डिजिटल ओळखपत्रे (उदा. आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स) हीसुद्धा वैध मानली जातील.

ही १२ ओळखपत्रे चालणार वैध पुरावा म्हणून

आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन कार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, शासकीय कर्मचारी ओळखपत्र, शासकीय योजना लाभार्थी कार्ड, तसेच ईपीआयसी क्रमांकासह अन्य अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणतेही एक दाखवता येईल.त्यामुळे मतदानाला जाताना मतदारांना कुठलीही अडचण येणार नाही. याबाबत निवडणूक विभागाकडून जनजागृतीही करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande