
छत्रपती संभाजीनगर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।
भाजपाच्या विजयाचा झेंडा भोकरदन नगरपालिकेत फडकेल, असा ठाम विश्वास भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी आज व्यक्त केला. भोकरदन नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस होता त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली.
नगरपरिषद निवडणुकीत भोकरदन चा बिगुल आज वाजला.. भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काही उमेदवारांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यापूर्वी भोकरदन निवासस्थानी नागरिक मोठ्या संख्येने आले होते. विशेषतः महिलांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला यावेळी नक्कीच भाजपाच्या विजयाचा झेंडा भोकरदन नगरपालिकेत फडकेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis