अमरावतीत शिवसेनेने जाहीर केले सहा नगराध्यक्ष पदांचे उमेदवार
अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.) शिवसेना नेते तथा अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी आज पत्रकार परिषद घेत आगामी नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांसाठी सहा नगर पालिकांच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले. भाजप व राष्ट्रवादी का
शिवसेनेने (शिंदे) जाहीर केले सहा नगर पालिकांच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार


अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.)

शिवसेना नेते तथा अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी आज पत्रकार परिषद घेत आगामी नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांसाठी सहा नगर पालिकांच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससोबत महायुती करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी ठरल्याने शिवसेना स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची घोषणा अडसूळ यांनी केली.

घोषित उमेदवारांमध्ये दर्यापूर येथून प्रदीप मलिये, अंजनगाव सुर्जी येथून डॉ. सौ. स्पृहा डकरे, अचलकपूर येथून सौ. रेखाताई जियालाल गड्रेल, मोर्शी येथून रवी गुल्हाने, शेंदुरजनाघाट येथून मीनाताई श्रीराम कोकाटे तर वरूड येथून सुनील तुदडराम यांचा समावेश आहे. उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म स्वतः अडसूळ यांच्या हस्ते देण्यात आले.अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण स्थितीचा आढावा घेऊन शिवसेनेने पूर्ण ताकदीने लढण्याची तयारी केली असल्याचे अडसूळ यांनी सांगितले. शिवसैनिक एकजुटीने काम केल्यास जिल्ह्यात पुन्हा विविध नगर पालिकांवर भगवा फडकणार, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या पत्रकार परिषदेस माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रीती बंड, संतोष बद्रे, श्याम देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande