
सोलापूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।
सिद्धेश्वर तलावात यंदाच्या उन्हाळ्यात ५८ कासवांच्या मृत्यूला सहा महिने उलटत असताच आता पुन्हा दोन कासवांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तलावातील पाण्याला पूर्ण हिरवा रंग आला असून तलाव संवर्धनासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनेला अपयश आल्याचे दिसून येत आहे.मे महिन्याच्या ८ तारखेला सिद्धेश्वर तलावात ५४ भारतीय व चार अमेरिकन अशा ५८ कसवांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृत कासवांची उत्तरीय तपासणी करून देखील कासावांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नव्हते. दरम्यान यावेळी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी या तलावाला भेट दिल्यानंतर महापलिका व देवस्थानकडून तात्पुरतेच उपाय करण्यात आले होते. यामध्ये तलावातील कारंजे सुरू करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड