सोलापुरात प्रथमेश कोठेंमुळे भाजप स्ट्राँग
सोलापूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।सोलापुरात एकीकडे भाजप तर्फे या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा झाला तर दुसरीकडे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या युवा नेता प्रथमेश कोठे यांचे सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले. स्वागत ही असे झाले की, संपूर्ण सोलापूर बघत राहिले
सोलापुरात प्रथमेश कोठेंमुळे भाजप स्ट्राँग


सोलापूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।सोलापुरात एकीकडे भाजप तर्फे या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा झाला तर दुसरीकडे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या युवा नेता प्रथमेश कोठे यांचे सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले. स्वागत ही असे झाले की, संपूर्ण सोलापूर बघत राहिले. यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाची ताकद सोलापुरात वाढली आहे.विधानसभा निवडणुकीच्या नंतर काही महिन्याने माजी महापौर महेश कोठे यांचे निधन झाले. अण्णांचे वारस प्रथमेश कोठे आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अण्णा हे शरद पवारांच्या राष्ट्रवादित होते पण एकूणच विधानसभेचा निकाल आणि सोलापूर शहर उत्तर विधानसभा निवडणुकीत तयार झालेले वातावरण पाहता प्रथमेश हे निश्चित दुसऱ्या पक्षात जातील अशी चर्चा होती. ते भाजप नको म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुद्धा प्रवेश करतील अशा चर्चा सुरू होत्या. पण आपले चुलत बंधू देवेंद्र कोठे हे भाजपचे आमदार असल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी भूमिका अनेकांची होती. पण त्याच भाजपमुळे अण्णा पडले असेही काही बोलत होते. पालकमंत्री जयकुमार गोरे हे सुद्धा बऱ्याच वेळा प्रथमेश यांना भेटले होते.अखेर प्रथमेश यांनी देवेंद्र कोठे यांना सोबत घेऊन भाजपात प्रवेश केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande