अमरावती : नगरपरिषद निवडणुकीत ‘ओल्या पार्ट्यांची’ लाट
अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.) नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आल्याने शहरात ‘ओल्या पार्ट्यांचे ’ नियोजन रविवारी मोठ्या प्रमाणावर करण्यात आले असल्याचे चित्र पहावयास मिळाले. नामांकन दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस उरले असताना अनेक इच्छुक उमेदवार
अमरावती : नगरपरिषद निवडणुकीत ‘ओल्या पार्ट्यांची’ लाट


अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.) नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आल्याने शहरात ‘ओल्या पार्ट्यांचे ’ नियोजन रविवारी मोठ्या प्रमाणावर करण्यात आले असल्याचे चित्र पहावयास मिळाले. नामांकन दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस उरले असताना अनेक इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ओल्या पार्ट्यांची मोहीम सुरू केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे संकेत मिळत असून, मतदारांना प्रलोभने देण्याच्या या पद्धतीवर सूज्ञ नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आचारसंहिता लागू असूनही निवडणूक आयोगाचे कडक नियम आणि त्यांची अंमलबजावणी करणारे अधिकारी प्रत्यक्षात कुठेच दिसत नसल्याची चर्चा मतदारांत सुरू आहे. पोलिस प्रशासनालाही स्पष्ट आदेश असूनही, ओल्या पार्ट्यांवर नियंत्रण कोणाच्या अखत्यारीत आहे, याबाबत संभ्रम कायम आहे.

निवडणूक आयोग पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त निवडणुकीचे दावे करतो; फिरती पथके, प्रशिक्षण, कागदी कामे यासह संपूर्ण यंत्रणा उभी असते. मात्र प्रत्यक्ष नियंत्रण आणि कारवाई मात्र फक्त कागदावरच असल्याची टीका स्थानिक नागरिकांनी केली. फिरत्या पथकाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शहरात निर्भयपणे सुरू असलेल्या ‘ओल्या पार्ट्यांवर ’वर कारवाई होणार का, निवडणूक विभाग आणि पोलिस याकडे खरंच लक्ष देणार का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, २ डिसेंबरपर्यंत पाटर्चा आणखी वेगाने सुरू राहण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande