
सोलापूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर शहरातील आयटी इंजिनिअर जुबेर हंगरगेकर याच्या संपर्कातील प्रत्येकाची पुणे व सोलापूरच्या दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) कसून चौकशी सुरू आहे. शुक्रवारी सोलापुरात आलेले ‘एटीएस’चे पथक अजूनही सोलापुरात मुक्कामी आहे. रविवारपर्यंत त्यांनी शहरातील १२ जणांची चौकशी केली आहे. तर अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे, साहित्य ‘एटीएस’ला जुबेरकडे सापडले आहे.
सध्या जुबेर न्यायालयीन कोठडीत आहे, परंतु त्याच्याशी संबंधित आणखी महत्त्वाची माहिती समोर येईल, अशी खात्री ‘एटीएस’ला आहे. जुबेरला अटक करण्यापूर्वी तो सोलापुरात १८ ते २० ऑक्टोबरपर्यंत सोलापुरात मुक्कामी होता. त्या दिवशी तो कोणाकोणासोबत होता, याचीही चौकशी केली जात आहे. त्या अनुषंगाने तपास करण्यासाठी पथक सोलापुरात दाखल झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड