लातूर : शिरूर ताजबंद येथे नाफेड सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन!
लातूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा या उद्देशाने नाफेडमार्फत (NAFED) शिरूर ताजबंद येथील सोसायटीमध्ये सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ज
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते


लातूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा या उद्देशाने नाफेडमार्फत (NAFED) शिरूर ताजबंद येथील सोसायटीमध्ये सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी हमीभाव योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन केले.

​सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना वार्‍यावर न सोडता, दिवाळी सण साजरा करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात आले. एवढ्यावरच न थांबता रब्बी पिकाच्या पेरणीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये दिले.

​ते पुढे म्हणाले, अतिवृष्टीनंतर शेतीत शिल्लक राहिलेल्या सोयाबीनला योग्य दर मिळावा यासाठी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून नाफेडमार्फत शिरूर ताजबंद येथील सोसायटी हमी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे.

​मागील वर्षी २८०० शेतकर्‍यांनी या केंद्रावर सोयाबीन घातले असून त्यांना त्याचे पेमेंट दिलेले आहे. शेतकर्‍यांनी घाबरुन जायचे कारण नाही, शेतकर्‍यांवर कोणत्या प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन सहकार मंत्री पाटील यांनी दिले.

​ जातीविरहित विकासाचे राजकारण

​यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच साहेबराव जाधव, तर प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ, उपसरपंच सुरज पाटील, चेअरमन राजकुमार सोमवंशी, केंद्रसंचालक तुळशीराम भोसले, व्हाईस चेअरमन सुभाष गुंडरे, संचालक दिलीप पाटील, बालाजी पडोळे, गटसचिव गोविंद तांबाळगे उपस्थित होते.

​चेअरमन राजकुमार सोमवंशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जातीविरहित विकासाचे राजकारण केले. सहकारातून सोसायटीच्या माध्यमातून जनतेला नेहमी सहकार्य केल्यानेच त्यांना सहकार मंत्री पद मिळाले आहे.

​कार्यक्रमास नामदेव विरळे, बालाजी गुंडरे, विजयकुमार युलमटे, माधव सरवदे, बाळासाहेब बेडदे, नारायण सूर्यवंशी, लक्ष्मण सारोळे, ईब्राहिम पठाण यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande