मविआतर्फे अलिबागमध्ये प्रचाराचा शुभारंभ
रायगड, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। अलिबाग नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीचा रणसंग्राम तापू लागला असून महाविकास आघाडीतर्फे अधिकृतरीत्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. अलिबाग शहरातील जागृत देवस्थान श्री काळंबादेवीचे दर्शन
अलिबाग नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीचा रणसंग्राम तापू लागला असून महाविकास आघाडीतर्फे अधिकृतरीत्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. अलिबाग शहरातील जागृत देवस्थान श्री काळंबादेवीचे दर्शन घेऊन उमेदवारांनी मंगळवार सायंकाळी नारळ वाढवून निवडणूक प्रचारास प्रारंभ केला. या वेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहिली. प्रचारामध्ये शेकाप, काँग्रेस व आघाडीचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.  थेट नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीने अक्षया प्रशांत नाईक यांना रिंगणात उतरवले आहे. याशिवाय सर्व दहा प्रभागांमध्ये आघाडीने आपले उमेदवार उभे केले असून संतोष गुरव, संध्या पालवणकर, सुषमा पाटील, प्रशांत नाईक, साक्षी पाटील, आनंद पाटील, रेश्मा थळे, महेश शिंदे, निवेदिता वाघमारे, समिर ठाकूर, ऋषीकेश माळी, अश्वीनी ठोसर, ॲड. मानसी म्हात्रे, अभय म्हामुणकर, ॲड. निलम हजारे, अनिल चोपडा, योजना पाटील, सागर भगत, शैला भगत, वृषाली भगत यांचा त्यात समावेश आहे.  श्री काळंबादेवीचे दर्शन घेतल्यानंतर उमेदवारांनी हजरत अली शाह दरबार व चेंढरे येथील श्री हनुमान मंदिराला भेट देत आशीर्वाद घेत प्रचार मोहीम पुढे नेली. शहरातील विविध भागांत जनसंपर्क साधत मतदारांना भेटून मतदानाचे आवाहन करण्यात आले.  प्रचाराच्या पहिल्या दिवशी आघाडीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. या वेळी ॲड. गौतम पाटील, अश्वीनी पाटील, सतिश प्रधान, अशोक प्रधान, इंद्रनील नाईक, सुनील थळे, रविंद्र ठाकूर, काँग्रेस तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, संजना कीर, ॲड. संतोष म्हात्रे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडीचा जोरदार, संघटित प्रचार पाहता आगामी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


रायगड, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।

अलिबाग नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीचा रणसंग्राम तापू लागला असून महाविकास आघाडीतर्फे अधिकृतरीत्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. अलिबाग शहरातील जागृत देवस्थान श्री काळंबादेवीचे दर्शन घेऊन उमेदवारांनी मंगळवार सायंकाळी नारळ वाढवून निवडणूक प्रचारास प्रारंभ केला. या वेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहिली. प्रचारामध्ये शेकाप, काँग्रेस व आघाडीचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

थेट नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीने अक्षया प्रशांत नाईक यांना रिंगणात उतरवले आहे. याशिवाय सर्व दहा प्रभागांमध्ये आघाडीने आपले उमेदवार उभे केले असून संतोष गुरव, संध्या पालवणकर, सुषमा पाटील, प्रशांत नाईक, साक्षी पाटील, आनंद पाटील, रेश्मा थळे, महेश शिंदे, निवेदिता वाघमारे आदींचा त्यात समावेश आहे.

श्री काळंबादेवीचे दर्शन घेतल्यानंतर उमेदवारांनी हजरत अली शाह दरबार व चेंढरे येथील श्री हनुमान मंदिराला भेट देत आशीर्वाद घेत प्रचार मोहीम पुढे नेली. शहरातील विविध भागांत जनसंपर्क साधत मतदारांना भेटून मतदानाचे आवाहन करण्यात आले. प्रचाराच्या पहिल्या दिवशी आघाडीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले.

महाविकास आघाडीचा जोरदार, संघटित प्रचार पाहता आगामी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande