मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरसमध्येच भाजपची मोर्चेबांधणी सुरू
सोलापूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.) - मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरसमध्येच भाजपची मोर्चेबांधणी सुरू असून मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक प्रकाश पाटील यांना भाजपमध्ये घेण्यात येणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राम सातपुते यां
मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरसमध्येच भाजपची मोर्चेबांधणी सुरू


सोलापूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.) - मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरसमध्येच भाजपची मोर्चेबांधणी सुरू असून मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक प्रकाश पाटील यांना भाजपमध्ये घेण्यात येणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे माळशिरसमधील उमेदवार निवडीचे अधिकार सोपवले आहेत. आता मोहिते पाटील यांच्या पारंपरिक विरोधकाचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार आहे, त्यामुळे मोहिते पाटलांना बालेकिल्ल्यात घेरण्याची तयारी भाजपने केल्याचे दिसत आहे. एकंदरीत जिल्ह्यात आता भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटील यांना वगळून राजकारण करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी, पंचायत समितीच्या माजी सदस्या श्रीलेखा पाटील हे काँग्रेस विचाराचे दाम्पत्य येत्या शुक्रवारी (ता. ७) भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्यानंतर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढून जिंकली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही माळशिरसमधून पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आला. या दोन्ही निवडणुकीत भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील हे अलिप्त होते. या पराभवाचा हिशेब चुकता करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande