बनावट जन्म-मृत्यू दाखल्याचे प्रकरण अमरावती मनपाच्या आरोग्य विभागातील लिपिक निलंबित
अमरावती, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावती महापालिकेतील बनावट जन्म मृत्यू दाखल्यांसदर्भात महापालिका आयुक्तांनी मनपा आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपिक शक्ती रंजीत घोगले याला तडकाफडकी निलंबित केले आहे.शक्ती घोगले यांची २६/०५/२०२५ चे आदेशानुसार कनिष्ठ लिपीक
बनावट जन्म-मृत्यू दाखल्याचे प्रकरण मनपाच्या आरोग्य विभागातील लिपिक निलंबित


अमरावती, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।

अमरावती महापालिकेतील बनावट जन्म मृत्यू दाखल्यांसदर्भात महापालिका आयुक्तांनी मनपा आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपिक शक्ती रंजीत घोगले याला तडकाफडकी निलंबित केले आहे.शक्ती घोगले यांची २६/०५/२०२५ चे आदेशानुसार कनिष्ठ लिपीक पदावर नेमणूक झालेली होती. त्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागात पदस्थापना देण्यात आलेली आहे. आरोग्य विभाग अंतर्गत जन्म-मृत्यु विभागातील कामकाजाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली होती. त्यानुसार जन्म मृत्यु प्रमाणपत्रासंबंधीत काम रितसर करणे आवश्यक होते. शक्ती। रंजीत घोगले यांच्यासंबंधी प्रसारित झालेल्या जन्म मृत्यु प्रमाणपत्राबाबत ऑडीओ क्लिप संदर्भात त्यांना कार्यालयाने । १४ ऑगस्ट २०२५ रोजी (पत्र क्र. अमनपा/साआवि/२९३/२०२५) कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी दि. १९/०८/२०२५ रोजी सादर केलेला खुलामा असमाधानकारक होता. त्यांनी कर्तव्याप्रती सचोटी । राखली नाही. त्यांनी महाराष्ट्र नागरी मेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ (१) (२) (३) चा भंग केला आहे, । असा ठपका ठेवत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) । नियम १९७९, नियम ४ च्या पोट नियम (एक) अन्वये महापालिका आयुक्त सौम्या शर्मा- चांडक यांनी कनिष्ठ लिपिक -शक्ती रंजीत घोगले यांना तात्काळ निलंबीत केलेले आहे.

शक्ती रंजीत घोगले यांचे निलंबन कालावधीतील- मुख्यालय झोन क्र. ५ येथे राहील. त्यांना पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच कोणताही खाजगी व्यवसाय, धंदा करता येणार नाही. निलंबनकाळात नियमाप्रमाणे वेतन व भत्ते अनुज्ञेय राहील, असे मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande