माय-बाप सरकार पॅकेजचे झाले काय?- अंबादास दानवे यांचा सवाल
लातूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. दिवाळीपुर्वी ते पैसे शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करणार होते. मात्र, सरकारने शेतक-यांना तुटपुंजी मदत करुन शेतक-यांची थट्टा केली आहे.
माय-बाप सरकार पॅकेजचे झाले काय?,


लातूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. दिवाळीपुर्वी ते पैसे शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करणार होते. मात्र, सरकारने शेतक-यांना तुटपुंजी मदत करुन शेतक-यांची थट्टा केली आहे. माय-बाप सरकार पॅकेजचे झाले काय?, अशी विचारणा करुन राज्य सरकारवर ४२० चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन माजी विरोधीपक्षनेते तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी लातूर येथे केले.

माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे लातूर दौ-यावर आले त्यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई दिवाळीपुर्वी देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही, असे नमुद करुन अंबादास दानवे पुढे म्हणाले, दिवाळी होऊन आठवडा झाला, तरी शेतक-यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाई जमा झाली नाही. अतिवृष्टीत शेतक-यांच्या जमिनी खरडून गेल्या, घरेदारे पडली, जनावरे वाहून गेली, परंतू, अद्याप अतिवृृष्टीग्रस्त शेतक-यांना मदत मिळाली नाही.

विरोधी पक्षाच्या वतीने शनिवारी निवडणुक आयोगाच्याविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राजकीय पक्षांसोबत सामान्य जनताही मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. यातून जनतेचा रोष दिसून आला. निवडणुक आयोगाच्याविरोधात या मोर्चाला विरोध म्हणून भारतीय जनता पार्टीने केलेल्या प्रती आंदोलनामुळे त्यांचीच फजितीत झाली. शेतक-यांच्या नुकसानीचे पंचानामे झालेले नाहीत. सोयाबीन, कापस हमीभावाने खरेदी होत नाही. हमीभाव खरेदी केंद्राचे काम अतिश्य संथगतीने सुरु आहे. शेतकरी अतिवृष्टीने संकटात सापडलेला असताना सरकारने थेट मदत करण्याऐवजी चालढकल सुरु केली आहे. कर्जमाफीबाबत अतिश्य कमालीचा निर्णय घेतला आहे.

३० जुनपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन सरकारने शेतकरी नेत्यांना दिले. समिती नेमली. समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी करु, असे सरकारचे म्हणणे अह्याहे. खरे तर कर्जमाफीसाठी अहवालाची गरज नाही. प्रशासन एका तासात कर्जाचा आकडा सांगु शकतील. सरकारची घोषणा, अध्यादेश आणि अंबलबजावणी यात कुठेही ताळमेळ नाही. सरकार लपवाछपवी करीत असल्यामुळे सरकारच्याविरोधात ४२० चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. या पत्रकार परिषदेस संतोष सोमवंशी, बालाजी रेड्डी, नामदेव चाळक, सुनिता चाळक, विष्णुपंत साठे, सुनील बसपूरे, बालाजी जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande