
रत्नागिरी, 4 नोव्हेंबर, (हिं. स.) : बहुजन समाज पार्टीचे विद्यार्थिदशेपासून आंबेडकर चळवळीतील मान्यवर काशिरामजींच्या सान्निध्यात घडलेले लढवय्ये नेते, प्रदेश सचिव, कोकण झोन प्रभारी राजेंद्र लहू आयरे यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.
आयरे यांच्यावर बुधवारी, दि. 5 नोव्हेबर रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. परटवणे येथील अशोक नगरातील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.आयरे यांच्या जाण्याने बहुजन समाज पार्टीबरोबरच बहुजन चळवळीसाठी न भरून येणारे नुकसान झाले आहे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
--------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी