नांदेड - बचतगटांना मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचतगटांनी मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्व
नांदेड - बचतगटांना मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


नांदेड, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचतगटांनी मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनाचा पुरवठा करणे ही योजना सुरू केली.

या योजनेच्या मार्गदर्शक सूचना 8 मार्च 2017 च्या शासन निर्णयान्वये शासन स्तरावरुन निश्चित केल्या आहे. सदर शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील इच्छुक पात्र बचतगटांनी सन 2025-26 करीता http://mini.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. त्याची सत्यप्रत 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत समाज कल्याण, नांदेड यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande