
नंदुरबार, 4 नोव्हेंबर, (हिं.स.) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित आणि त्याअंतर्गत कार्यरत 13 उपकंपन्यांची स्थापना शासनाने केली आहे. इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासाठी ही सर्व कार्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड नंदुरबार येथे सुरू करण्यात आली आहेत, असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय तायडे यांनी माहिती दिलीआहे.
नव्याने सुरु झालेली आर्थिक विकास महामंडळे:
लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या.
आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या.
संत श्री. रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ मर्या.
संत श्री. संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ मर्या.
संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मर्या.
सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या.
संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या.
श्री. संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या.
स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ मर्या.
सोळा कुलस्वमिनी आर्थिक विकास महामंडळ मर्या.
संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ मर्या.
जगदज्योती महात्मा बसमेश्वर आर्थिक विकास महामंडळ मर्या.
संत सेना महाराज केशशिल्पी आर्थिक विकास महामंडळ मर्या.
महामंडळामार्फत एकूण सहा योजना राबवल्या जात आहेत.
ऑनलाईन स्वरुपाच्या योजना
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
गट कर्ज व्याज परतावा योजना
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना
या योजनांसाठी पात्र अर्जदारांनी www.msobcfdc.org या वेब पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक आहे.
ऑफलाईन स्वरुपाच्या योजना
20 टक्के बिज भांडवल योजना
थेट कर्ज योजना
या योजनांचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत.
महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थींनी ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक
माहितीसाठी आणि योजनेसंदर्भात www.msobcfdc.org या संकेतस्थळावर तसेच डॉ. बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक 02564-210062 येथे
संपर्क साधावा, असेही महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक
श्री. तायडे यांनी माहिती दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर