जर ममदानी जिंकले तर न्यूयॉर्क आर्थिक आणि सामाजिक आपत्ती बनेल- डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन , 4 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क सिटीच्या महापौर निवडणुकीच्या अगोदर डेमोक्रॅट उमेदवार जोहरान ममदानी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला की जर ममदानी निवडून आले, तर न्यूयॉ
जर ममदानी जिंकले तर न्यूयॉर्क आर्थिक आणि सामाजिक आपत्ती बनेल- डोनाल्ड ट्रम्प


वॉशिंग्टन , 4 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क सिटीच्या महापौर निवडणुकीच्या अगोदर डेमोक्रॅट उमेदवार जोहरान ममदानी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला की जर ममदानी निवडून आले, तर न्यूयॉर्कला आर्थिक आणि सामाजिक विध्वंसाचा सामना करावा लागेल. ट्रम्प म्हणाले, की जर ममदानी महापौर झाले, तर ते न्यूयॉर्क सिटीला केवळ अत्यल्प फेडरल निधी देतील.

ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करताना लिहिले, “जर कम्युनिस्ट उमेदवार जोहरान ममदानी महापौर झाले, तर न्यूयॉर्क सिटीसाठी यश किंवा अस्तित्वाची कोणतीही संधी उरणार नाही. मी या शहरावर चांगले पैसे वाया घालवू इच्छित नाही.” त्यांनी पुढे म्हटले, “जर ममदानी जिंकले, तर न्यूयॉर्क सिटी एक पूर्ण आर्थिक आणि सामाजिक आपत्ती बनेल.”ट्रम्प यांनी माजी न्यूयॉर्क राज्यपाल अँड्र्यू कुओमो यांना उघडपणे पाठिंबा देताना म्हटले, “तुम्हाला कुओमो आवडोत वा न आवडोत, पण तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. शहराच्या हितासाठी ममदानी नव्हे, तर कुओमो यांनाच मत द्या.”

जोहरान ममदानी हे भारतीय वंशाचे असून त्यांचा जन्म युगांडामध्ये झाला आणि त्यांचे बालपण न्यूयॉर्कमध्ये झाले. ते न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीचे सदस्य असून डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पक्षाचे उमेदवार आहेत. ममदानी हे प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आणि युगांडाई-भारतीय लेखक महमूद ममदानी यांचे पुत्र आहेत.निवडणूक प्रचारादरम्यान ममदानी यांनी म्हटले की ते न्यूयॉर्कमधील वाढती महागाई आणि भाड्याची समस्या सोडवतील. त्यांनी वचन दिले की महापौर झाल्यावर सर्व स्थिर भाडेकरूंना भाड्यात वाढ होऊ दिली जाणार नाही आणि परवडणाऱ्या घरांसाठी संसाधनांना प्राधान्य दिले जाईल.

न्यूयॉर्क निवडणूक आयोगानुसार, यावेळी 7.35 लाखांहून अधिक लोकांनी वेळेआधी मतदान केले आहे, जे 2021 च्या तुलनेत सुमारे चारपट अधिक आहे. महापौरपदासाठी मुख्य मतदान 4 नोव्हेंबरला होणार असून, नववर्षाच्या सुरुवातीला विजेता पदभार स्वीकारेल. विविध सर्वेक्षणांनुसार जोहरान ममदानी यांना 47 टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे आणि ते अँड्र्यू कुओमो यांच्यापेक्षा 18 टक्के पुढे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर रिपब्लिकन उमेदवार कर्टिस सिल्वा आहेत, ज्यांना 16 टक्के लोकांचा पाठिंबा मिळालेला आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande