भारतीय वंशाच्या गजाला हाश्मी व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर
वॉशिंग्टन, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यात भारतीय वंशाच्या गजाला हाश्मी या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून निवडून आल्या आहेत. या राज्यातील या सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या गजाला हाश्मी या पहिल्या मुस्लिम आणि दक्षिण आशियाई वंशाच्या महिला
भारतीय वंशाच्या गजाला हाश्मी ठरल्या व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर


वॉशिंग्टन, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यात भारतीय वंशाच्या गजाला हाश्मी या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून निवडून आल्या आहेत. या राज्यातील या सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या गजाला हाश्मी या पहिल्या मुस्लिम आणि दक्षिण आशियाई वंशाच्या महिला ठरल्या आहेत.

61 वर्षांच्या डेमोक्रॅट नेत्या गजाला हाश्मी यांनी लेफ्टनंट गव्हर्नर पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते जॉन रीड यांचा पराभव केला. व्हर्जिनियामध्ये मंगळवारी मतदान झाले होते.अमेरिकन राजकारणात भारतीय वंशाच्या लोकांचा वाढता सहभाग दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये अमेरिकेत महत्त्वाच्या पदांसाठी 30 पेक्षा जास्त भारतीय-अमेरिकन आणि दक्षिण आशियाई उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

गजाला हाश्मी या एक शिक्षिका राहिल्या आहेत आणि त्या सर्वसमावेशक मूल्ये तसेच सामाजिक न्यायाच्या पुरस्कर्त्या आहेत. त्यांनी सार्वजनिक शिक्षण, मतदानाचा अधिकार आणि लोकशाहीचे संरक्षण, शस्त्रास्त्रांमधील हिंसाचाराची आळा, पर्यावरण संरक्षण, परवडणारे गृहनिर्माण आणि आरोग्यसेवा या मुद्द्यांना आपली प्रमुख प्राधान्ये असल्याचे सांगितले.

सामुदायिक संस्था ‘इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट फंड’ ने व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदासाठी झालेल्या निवडणुकीत हाश्मी यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. इम्पॅक्ट फंडने सांगितले की त्यांनी हाश्मी यांच्या प्रचार मोहिमेसाठी 1,75,000 अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली होती, जेणेकरून मतदारांना एकत्र आणता येईल आणि सरकारच्या प्रत्येक स्तरावर प्रतिनिधित्व अधिक मजबूत करता येईल.

इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट फंडचे कार्यकारी संचालक चिंतन पटेल यांनी हाश्मी यांच्या विजयाला समुदाय आणि लोकशाहीसाठी एक ऐतिहासिक क्षण असे संबोधले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande