हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीसाठी उबाठा गटाकडून इच्छूकांच्या प्राथमिक मुलाखती संपन्न
कोल्हापूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते आणि आमदार सुनील प्रभू व संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पक्षाचे उपनेते संजय पवार व जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थित
शिवसेना ठाकरे गट इच्छुकांच्या मुलाखती


कोल्हापूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते आणि आमदार सुनील प्रभू व संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पक्षाचे उपनेते संजय पवार व जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत होऊ घातलेल्या हातकणंगले नगरपंचायतीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगरपंचायत निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांची प्राथमिक मुलाखत संपन्न झाली.

या मुलाखतीच्या सुरुवातीस शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना हातकणंगले हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो अबाधित ठेवायचा असेल तर सामान्य शिवसैनिकांना बळ देणे गरजेचे असून कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्ष पदा सहित सन्मानजनक जागा मिळाव्यात ही आग्रही भूमिका लावून धरली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी सर्व शिवसैनिकांनी झपाटून कामाला लागावे, पक्षनेतृत्व नक्कीच शिवसैनिकांचा मान आणि अभिमान वाढावा असाच निर्णय घेईल आणि येणाऱ्या हातकणंगले नगरपंचायतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच नगराध्यक्ष बसेल असा विश्वास प्राप्त झाला असल्याचे मत व्यक्त केले.

तसेच आपल्या मनोगतामधून जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना येणारी निवडणूक ही सामान्य शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये पक्षाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक शिवसैनिकाला आणि पदाधिकाऱ्याला न्याय देण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. तसेच हातकणंगले नगरपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे मत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित सर्वच शिवसैनिकांनी एक मताने लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अभिषेक प्रसाद पाटील यांचे नाव सुचवून त्या नावाला एकमुखाने पाठींबा असल्याचे जाहीर केले. नगरसेवक पदासाठी बहुतांशी सर्वच प्रभागासाठी यावेळी एकूण १९ इच्छूक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.

यावेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, शहरप्रमुख धोंडीराम कोरवी, सुरेश खोत, राजू शिंदे, शहरप्रमुख विश्वास कोळी, अभिषेक पाटील व इतर इच्छूक उमेदवार, शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande