
जळगाव , 4 नोव्हेंबर (हिं.स.)खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत भरडधान्य खरेदीसाठी शासनाच्या हमीभाव योजनेनुसार जिल्ह्यात 17 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. ज्वारी 3699, मका 2400 आणि बाजरी 2775 प्रति क्विंटल हमीभाव निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती पणन महासंघाचे संचालक मंत्री संजय सावकारे, उपाध्यक्ष रोहित निकम आणि संचालक संजय पवार यांनी दिली. जळगाव जिल्ह्यात मंजूर केंद्रांमध्ये अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, पाळधी, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून शासनाच्या हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर