उद्धव सरकारने गमावलेला ओबीसींचा हक्क महायुतीने मिळवला - बावनकुळे
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी २७ टक्के राजकीय आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याबद्दल महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती स
उद्धव सरकारने गमावलेला ओबीसींचा हक्क महायुतीने मिळवला - बावनकुळे


मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी २७ टक्के राजकीय आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याबद्दल महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

ते म्हणजे, फडणवीस यांच्या व्यक्तिगत प्रयत्नांमुळे सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाची बाजू यशस्वीपणे मांडली गेली, ज्यामुळे निवडणुकीला परवानगी मिळाली. ओबीसींचे २७ टक्के आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात गमावले होते, मात्र राज्यात शिंदे-फडणवीस-पवार यांचे महायुतीचे सरकार आल्यानंतर, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घातले. सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात प्रभावीपणे बाजू मांडली, ज्यामुळे २७ टक्के आरक्षणासह निवडणुका घेण्यास कोर्टाने हिरवा कंदील दिला.

* विरोधकांचे आरोप निराधार

मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचा बावनकुळे यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले, तीच यादी आता नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी वापरली जात आहे. तुम्ही निवडून आले तेव्हा यादी बरोबर होती आणि आता चुकलेली आहे, हे विरोधकांचे खोटाडेपण आहे. पराभवाची भीती असल्यामुळे विरोधक खोटा 'नरेटिव्ह' तयार करत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला ५१ टक्के मते मिळून मोठा विजय मिळेल, हे विरोधकांनी ओळखले आहे.

* रोहित पवार एक हजार मिळवा

रोहित पवार यांच्या 'निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव' या आरोपाला उत्तर देताना बावनकुळे यांनी आव्हान दिले की, ते ज्या यादीवर निवडून आले आणि नगरपालिकेच्या यादीत फरक दाखवावा व एक हजार रुपये बक्षीस घेऊन जावे. यादी तीच असून विरोधक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande