वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘एटीएसची नोटीस
सोलापूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। वळसंग पोलिसांच्या हद्दीतील कुंभारीजवळील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील १६ ते १८ वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी १८ ते २० ऑक्टोबर रोजी कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी जुबेर हंगरगेकर प्रमुख पाहुणा होता. पुढील चार-पाच दिवसांतच
News


सोलापूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। वळसंग पोलिसांच्या हद्दीतील कुंभारीजवळील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील १६ ते १८ वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी १८ ते २० ऑक्टोबर रोजी कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी जुबेर हंगरगेकर प्रमुख पाहुणा होता. पुढील चार-पाच दिवसांतच दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याने जुबेरला पुण्यातून अटक केली होती. त्याअनुषंगाने आता ‘एटीएस’ने कार्यक्रमाचे आयोजक ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’ संघटनेच्या मजहर नामक पदाधिकाऱ्यास नोटीस बजावली आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.‘एटीएस’च्या कारवाईत जुबेरकडील मोबाईल, लॅपटॉपमध्ये ‘अल कायदा’ संघटनेशी संबंधित बरेच महत्त्वाचे पुरावे, माहिती हाती लागले आहे. या प्रकरणात मूळचा सोलापूर शहरात राहणारा जुबेर अटकेत आहे. दरम्यान, सोलापुरातील ज्या संस्था व शाळेच्या संयुक्त विद्यमाने तो कार्यक्रम झाला, त्या सर्वांकडे चौकशी सुरू आहे. याशिवाय कार्यक्रमास उपस्थितांकडेही माहिती पोलिस घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande