रत्नागिरी : श्रीक्षेत्र परशुराम डोंगरमाथ्यावर बुधवारी पणती प्रज्वलन
रत्नागिरी, 4 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण तालुक्यातील श्रीक्षेत्र भार्गवराम (परशुराम) डोंगरमाथ्यावर सवतसड्याच्यावरील टेकडीवर असणारी पुरातन भव्य पणती यावर्षीही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रज्वलित केली जाणार आहे. बुधवारी, दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंक
रत्नागिरी : श्रीक्षेत्र परशुराम डोंगरमाथ्यावर बुधवारी पणती प्रज्वलन


रत्नागिरी, 4 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण तालुक्यातील श्रीक्षेत्र भार्गवराम (परशुराम) डोंगरमाथ्यावर सवतसड्याच्यावरील टेकडीवर असणारी पुरातन भव्य पणती यावर्षीही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रज्वलित केली जाणार आहे. बुधवारी, दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री ग्रामदैवत जुना काळभैरव मंदिरात श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल.

भक्तांसाठी श्री क्षेत्र परशुराम मंदिरापर्यंत ने-आण व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता श्री देव भार्गवराम परशुराम देवस्थानातून मशाल पेटवून बजरंग मित्रमंडळ व भक्तगण पायरवाडी मार्गे दीपमाळ टेकडीवर पोहोचतील.ही दीपमाळ जांभ्या दगडात कोरलेली असून शिवकालीन वास्तू मानली जाते. महेंद्रगिरी पर्वताच्या सर्वोच्च शिखरावर वसलेली ही दीपमाळ चिपळूण शहरातूनही स्पष्ट दिसते. या उंच माथ्यावरून श्री परशुराम मंदिर, गाव तसेच सह्याद्रीच्या मुख्य आणि उपरांगा यांचे अप्रतिम दृश्य दिसते.या पणतीमध्ये पूर्वी १५ किलो गोडेतेलाचा एक डबा आणि धोतराच्या पानाची वात वापरली जात असे. गेल्या २२ वर्षांपासून या दीपप्रज्वलनाची परंपरा पुनश्च सुरू करण्यात आली आहे. श्री ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षी या प्रज्वलनासाठी तेल व वात अर्पण केली जाते. दीपप्रकाश श्री परशुराम मूर्तीवर पडतो, अशी श्रद्धा आहे.

भग्न अवस्थेत असलेली ही दीपमाळ २००१ साली स्थानिक कार्यकर्त्यांनी पुनर्बांधणी करून पुन्हा तेजोमय केली. या उपक्रमात नितीन लोकरे, अभय शिंदे, राजा राऊत, अमोल जोगळेकर, विजय पाथरे, समीर राऊत, अभी शेट्ये, दिनेश पटवर्धन, संकेत राऊत, साहील रानडे, संतोष शिंदे, देवेंद्र गोंधळेकर, प्रवीण गोंधळेकर, सुरेश बहुतले, अभय सहस्रबुद्धे, ओंकार गोखले, विनय पिंपुटकर, उत्कर्ष नाखरे, जयदीप जोशी, संतोष मोरे, राऊत आळी व परशुराम, पेढे, चिपळूण परिसरातील असंख्य भक्तगणांचा सहभाग आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नितीन लोकरे (8149444044), अभय शिंदे (7218869037), समीर शेट्ये (9890159247), शंकर कानडे (7774021100) किंवा जयदीप जोशी (9028989125) यांच्याशी संपर्क साधावा. भक्तगणांनी या ऐतिहासिक दीपमाळ प्रज्वलन सोहळ्याचे दर्शन घेऊन श्री भार्गवरामाचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande