
बीड, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मौजे लुखामसला येथे ६१ लाख रुपये किंमतीच्या विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या हस्ते संपन्न झाला.
याचसोबत येथील ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारत आणि खुल्या व्यायाम शाळेचे लोकार्पण तसेच शाळा खोली व अंगणवाडी खोली बांधकामाचा शुभारंभ देखील माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी बचत गटासाठी सहकार्य करण्याबाबतचे निवेदन दिले. यावेळी पंचवटी संस्थानचे मठाधिपती गोविंद महाराज, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सरपंच प्रतापसिंह पंडित, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास सरपंच रावसाहेब काळे, विक्रम नलभे, वैजीनाथ नलभे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis