कराड तालुक्यातील अनेक सरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
मुंबई, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सैदापुर चे सरपंच फत्तेसिंह धनाजी जाधव, उपसरपंच अनिल जाधव तसेच कराड उत्तर मधील विलास माने, सरपंच देवदत्त माने, माजी सरपंच कृष्णा बर्गे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जन
कराड तालुक्यातील अनेक सरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश


मुंबई, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सैदापुर चे सरपंच फत्तेसिंह धनाजी जाधव, उपसरपंच अनिल जाधव तसेच कराड उत्तर मधील विलास माने, सरपंच देवदत्त माने, माजी सरपंच कृष्णा बर्गे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये मंगळवारी प्रवेश केला. कराड उत्तर व दक्षिण मधील उपसरपंच, अनेक ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायट्यांचे अध्यक्ष व माजी अध्यक्ष यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचे राजकारण आणि राष्ट्रीयत्वाने प्रेरित होऊन आज या कराड उत्तर आणि दक्षिण मधील अनेकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. परिसराच्या विकासासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला त्याला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन श्री. चव्हाण यांनी दिले.

आ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, सैदापूर गावातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर विकासासाठी या सर्वांनी मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सातारा जिल्हा तसेच कराड तालुका नेहमीच विकासकामांमध्ये अग्रक्रमी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

आ.मनोज घोरपडे म्हणाले की, या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्याने भाजपाचा विजय होईल. नजिकच्या काळात अनेक महत्वपूर्ण प्रवेश होणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.

कराड उत्तर मतदारसंघातील काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश सरचिटणीस उमेश साळुंखे, माजी उपसरपंच जयवंत माने, अभिजित माने, विलास माने, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने, विक्रम माने, पुण्यातील टालगोस कंपनीचे व्यवस्थापक विवेक साळुंखे आदींनी भाजपा मध्ये प्रवेश केला.

कराड दक्षिण मतदारसंघातील ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार देसाई, सुरेश हजारे, संदीप ठोंबरे, सुनील जाधव, सैदापुर विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष रमेश जाधव, माजी अध्यक्ष शरद जाधव, सीताराम जाधव, विकास सेवा सोसायटीचे संचालक सलीम मुलाणी, राजकिरण जाधव, वसंत जाधव, सतीश जाधव आदींचा भाजपा मध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande