
लातूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा
बाह्यरुग्ण विभाग 5 नोव्हेंबर रोजी बंद राहणार असून
6 नोव्हेंबरपासून नियमित वेळेप्रमाणे कामकाज सुरु राहणार आहे
गुरुनानक जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बुधवार, 5 नोव्हेंबर, २०२५ रोजी बंद राहील. तसेच गुरुवार, 6 नोव्हेंबर, २०२५ पासून शासकीय सुट्टीच्या दिवशी बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल अंभगे यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis