परभणी - रासायनिक खतांच्या किंमतीविरोधात तालुका दबाव गटाचे कृषिमंत्र्यांना निवेदन
परभणी, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। राज्यातील शेतकर्‍यांवर आधीच नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अस्थिरतेचे संकट ओढवले असताना, रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ करण्यात येऊ नये, अशी मागणी तालुका दबाव गटाने राज्याचे कृषिमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.

यंदा राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घालत खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. फळबागांनाही मोठा फटका बसला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याशिवाय नाफेड व सीसीआयमार्फत मूग, सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू आहे. या परिस्थितीत रासायनिक खतांच्या किंमती वाढविण्याचा विचार शेतकर्‍यांवर अन्याय करणारा ठरेल, असे निवेदनात म्हटले आहे. खतांचा तुटवडा, लिंकेजच्या अडचणी, तसेच अप्रमाणित खतांच्या विक्रीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाकडून पुरेसे नियंत्रण नसल्यामुळे अनेक ठिकाणी काळाबाजार आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते. अशा परिस्थितीत जर खतांच्या भावात वाढ झाली, तर शेती व्यवसायावर गंभीर संकट येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. शेतकर्‍यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने खतांच्या किंमतीतील दरवाढीचा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावर अ‍ॅड. श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, गुलाब पौळ, सतीश काकडे, सुभाष काकडे, मुकुंद टेकाळे, रामचंद्र कांबळे, लक्ष्मण प्रधान, देवराव दळवे, योगेश सुर्यवंशी, राजाभाऊ मोगल, उदय सोळंके, नारायण पवार, अजय बुरे, भारत रवंदले, रोफभाई, लिंबाजी कलाल, अजित मंडलिक, दत्ता कांगणे, भारत झाल्टे, राजेंद्र केवारे, अ‍ॅड. रामेश्वर शेवाळे, अ‍ॅड. पांडुरंग आवटी, विलास रोडगे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

 rajesh pande