सर्व नगरपालिकांवर भाजपाचाच झेंडा फडकवू — सुरेश वरपुडकर
परभणी, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। “परभणी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष सर्व शक्तीनिशी लढविणार असून, सर्व नगरपालिकांवर भाजपाचाच झेंडा फडकेल,” असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी
माजी मंत्री सुरेश वरपूडकर


परभणी, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। “परभणी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष सर्व शक्तीनिशी लढविणार असून, सर्व नगरपालिकांवर भाजपाचाच झेंडा फडकेल,” असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी व्यक्त केला.

नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बोलताना वरपुडकर म्हणाले, “राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार हे अपेक्षितच होते. पहिल्या टप्प्यात नगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका, तर शेवटी महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल.”

ते पुढे म्हणाले, “शहरी असो वा ग्रामीण भाग — सर्वसामान्य मतदार महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे जनतेच्या पाठीशी महायुतीचे सरकार सातत्याने उभे राहिले आहे. सरकारने घेतलेले विकासात्मक निर्णय, राबविलेली धोरणे आणि आगामी काळातील विकास आराखडा लक्षात घेता नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.”

वरपुडकर यांनी स्पष्ट केले की, “नगरपालिका निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांसोबत एकत्र लढण्यासाठी गांभीर्याने चर्चा सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी युती शक्य नाही, त्या ठिकाणी भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल. जिल्ह्यात बहुतांश नगरपालिकांमध्ये पक्ष स्वबळावर जाण्याचे चित्र स्पष्ट होत आहे. तथापि, अंतिम निर्णय महायुतीतील सर्व नेतेमंडळी एकत्रितपणे घेतील.”

त्यांनी पुढे सांगितले की, “विकास आणि सुशासनाच्या बळावरच भाजप पुन्हा एकदा जनतेच्या मनात स्थान निर्माण करेल आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांवर भगवा फडकेल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande