आशिष शेलार यांनी दिली धाराशिव जिल्ह्यातील शासकीय वस्तुसंग्रहालयास भेट
धाराशिव, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील शासकीय वस्तुसंग्रहालयास भेट दिली धाराशिव दौऱ्यावर असताना तेर येथील महाराष्ट्र राज्य, पुरातत्व व वस्तुसंग्
सातवाहन काळातील मातीच्या मूर्ती, नाणी, शिल्पकला, प्राचीन दैनंदिन वापरातील वस्तू आणि ऐतिहासिक पुराव्यांची पाहणी


धाराशिव, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील शासकीय वस्तुसंग्रहालयास भेट दिली

धाराशिव दौऱ्यावर असताना तेर येथील महाराष्ट्र राज्य, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयांतर्गत असलेल्या कै. रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालयास भेट दिली. तेर नगरीच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाऱ्या या संग्रहालयातील सातवाहन काळातील मातीच्या मूर्ती, नाणी, शिल्पकला, प्राचीन दैनंदिन वापरातील वस्तू आणि ऐतिहासिक पुराव्यांची पाहणी केली.

यावेळी राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, अन्य शासकीय अधिकारी आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande