पुणे - मुग, उडिद व सोयाबीन खरेदी प्रक्रिया नाफेड मार्फत सुरु करणार
पुणे, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई आणि नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात मुग, उडिद व सोयाबीन खरेदी प्रक्रिया राबविण्यात येण
पुणे - मुग, उडिद व सोयाबीन खरेदी प्रक्रिया नाफेड मार्फत सुरु करणार


पुणे, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई आणि नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात मुग, उडिद व सोयाबीन खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणी प्रक्रिया दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ पासून सुरु करण्यात आली असून, प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे.

केंद्र शासनाने निश्चित केलेले आधारभूत प्रति क्विंटल दर पुढीलप्रमाणे आहेत मुग रु. ८ हजार ७६८, उडिद रु. ७ हजार ८०० व सोयाबीन रु. ५ हजार ३२८ प्रति क्विंटल असा आहे. पुणे जिल्ह्यासाठी नाफेड यांना खरेदीसाठी जबाबदारी दिलेली आहे.

शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या आधारभूत दरानुसार मुग, उडिद व सोयाबीन विक्रीसाठी आपल्या गावाजवळील नाफेड खरेदी केंद्रावर जावे. नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा ७/१२ उतारा आणि पीकपेरा प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक असून नोंदणी पॉस मशीनद्वारे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे विक्रीसाठी सूचना देण्यात येतील. त्यानंतर शेतमाल प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर आणून विक्री करता येईल.

ही योजना शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरिता राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष श्री. रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर बी. डुबे-पाटील तसेच संचालक मंडळ यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande