
एनसीआरबीच्या अहवालात पुढे आली धक्कादायक माहिती
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर (हिं.स.) : ड्रग ओव्हरडोजमुळे देशभरात दररोज काही लोकांचा जीव जात आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) यासंदर्भात ताजे आकडे जाहीर केले आहेत. देशात 2019 ते 2023 या कालावधीत झालेल्या ड्रग ओव्हरडोजमुळे झालेल्या मृत्यूंचा यात उल्लेख आहे. या अहवालानुसार, देशात दर आठवड्याला 12 लोकांचा मृत्यू ड्रग ओव्हरडोजमुळे होतो.
एनसीआरबीच्या माहितीनुसार, 2023 मध्ये दर आठवड्याला सरासरी 12 लोकांचा मृत्यू ड्रग ओव्हरडोजमुळे झाला आहे. तसेच 2019 ते 2023 या कालावधीत दररोज सुमारे 2 जणांचा मृत्यू ड्रग ओव्हरडोज हीच मुख्य कारण ठरली आहे. तथापि, या अहवालात फक्त ड्रग ओव्हरडोजमुळे झालेल्या निश्चित (कन्फर्म) मृत्यूंचाच समावेश करण्यात आला आहे. ड्रग ओव्हरडोजशी संबंधित अनेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत, त्यामुळे त्या आकडेवारीचा समावेश एनसीआरबीच्या अहवालात नाही.
प्रारंभीच्या आकडेवारीनुसार, तमिळनाडू या राज्यात ड्रग ओव्हरडोजच्या सर्वाधिक घटना नोंदल्या गेल्या होत्या, परंतु आता तेथील प्रकरणांमध्ये घट दिसून येत आहे. तसेच 2019 मध्ये तमिळनाडूमध्ये ड्रग ओव्हरडोजमुळे 108 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 2023 मध्ये हा आकडा घटून 64 वर आला आहे.
दुसरीकडे, 2019 मध्ये पंजाब या राज्याचे नाव टॉप 5 राज्यांमध्ये नव्हते, पण 2022 मध्ये पंजाबमध्ये ड्रग ओव्हरडोजमुळे तब्बल 144 लोकांचा मृत्यू झाला. तर 2023 मध्ये हा आकडा घटून 89 इतका नोंदवण्यात आला आहे.------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी