
नांदेड, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।नांदेड जिल्ह्यातील किनवट देगलूर बिलोली कंधार मुखेड या नगरपालिकेत येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे
3 डिसेंबर रोजी मतदानाचा निकाल लागणार आहे राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल लागणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने मंगळवारी ४ नोव्हेंबर रोजी दिली.
राज्यात गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर रोजी सुरूवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर असेल. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल. अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबर अशी असेल. तर अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत २५ नोव्हेंबर ही असेल.२६ नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. याच दिवशी त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटपही केले जाईल. त्यानंतर २ डिसेंबर रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होईल. त्यानंतर दुस-या दिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस १० डिसेंबर असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis