पिंपरी महापालिकेतील उद्योग सुविधा कक्षाचे कामकाज ठप्प ?
पुणे, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरातील लघुउद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत स्थापन केलेल्या उद्योग सुविधा कक्षाचे कामकाज गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाल्याचा आरोप फाेरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे
पिंपरी महापालिकेतील उद्योग सुविधा कक्षाचे कामकाज ठप्प ?


पुणे, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरातील लघुउद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत स्थापन केलेल्या उद्योग सुविधा कक्षाचे कामकाज गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाल्याचा आरोप फाेरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केला आहे. कक्षाचे कामकाज सुरळीत सुरु असल्याचे दावा महापालिकेने केला आहे.महापालिका व स्थानिक उद्योजकांमध्ये संवाद वाढावा, उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तत्काळ निराकरण व्हावे, औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी महापालिकेने ‘उद्योग सुविधा कक्ष’ स्थापन केला आहे.

औद्योगिक गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणे. व्यापारी, उद्योजक व कामगार संघटनांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेणे व त्याचे निराकरण करणे. गुंतवणूकदार उद्योजकांना प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय सहकार्य या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले होते. मात्र, या उद्योग कक्षातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande