पुणे - शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करण्याची शेतकरी अधिकार परिषदेची मागणी
पुणे, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)शेतकरी हा अतिवृष्‍टी, नैसर्गिक आपत्ती आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्‍त झाला असून, त्यांचा आक्रोश आणि आत्‍महत्‍या सतत वाढत आहेत. सरकारच्‍या आर्थिक धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार आणि महिलांचे प्रश्‍न गंभीर झाले आहेत. शेतक
पुणे - शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करण्याची शेतकरी अधिकार परिषदेची मागणी


पुणे, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)शेतकरी हा अतिवृष्‍टी, नैसर्गिक आपत्ती आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्‍त झाला असून, त्यांचा आक्रोश आणि आत्‍महत्‍या सतत वाढत आहेत. सरकारच्‍या आर्थिक धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार आणि महिलांचे प्रश्‍न गंभीर झाले आहेत. शेतकऱ्यांवरील अन्‍यायकारक धोरणे व तुटपुंजी आर्थिक मदत याविरोधात आवाज उठविण्‍यात येत असून शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करा, अशी मागणी शेतकरी न्‍याय हक्‍क व अधिकार संघटना परिषदेचे सदस्‍य तथा ज्‍येष्‍ठ साहित्यिक व शेतकरी वारकरी कष्‍टकरी महासंघाचे अध्‍यक्ष धनंजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी जय शिवराय शेतकरी संघटनेचे अध्‍यक्ष दिलीप गायकवाड, चक्रवर्ती बळिराजा व सांस्‍कृतिक मंचचे अध्‍यक्ष बाळासाहेब रास्‍ते, पंचमवेद वारकरी शिक्षण संस्‍था, देहूचे अध्‍यक्ष भगवान जाधव, डॉ. मानसी पाटील व लेखक तथा कवी अकबर शेख उपस्थित होते. उद्योजक व व्‍यावसायिक कर्जबुडव्‍यांना सरकारने कर्जमुक्‍त केले. त्‍याच धर्तीवर शेतकऱ्यांवरील सर्व कर्ज अनैतिक ठरवून त्‍यांनाही कर्जमुक्‍त करावे, अशी मागणी या वेळी करण्‍यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande